Wednesday 13 March 2013

सिगारेटमुळे स्मृतीभ्रंशासारखे आजार होण्याचा धोका!

           सिगारेटमुळे स्मृतीभ्रंशासारखे आजार होण्याचा धोका! 



sigarate
WD
सध्याच्या कार्पोरेट जमान्यात धूम्रपान आता व्यसन न राहता एक फॅशन बनली आहे, पण सिगारेटचा एक झुरका 'दुनिया मुठ्ठीमें'चा आभास निर्माण करत असला तरीसुद्धा त्याचा सर्वाधिक धोका मानवी स्मरणशक्तीला असल्याचे दिसून आले. सिगारेट ओढणार्‍या व्यक्तीची रोज एकतृतीयांश स्मरणशक्ती लोप पावते असे डॉक्टरांनी म्हटले आहे. नॉर्थंब्रिया विद्यापीठाच्या वैद्यकीय संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब उघड झाली आहे, पण धूम्रपानाला पूर्ण सोडचिठ्ठी दिल्यास मात्र व्यक्तीला पुन्हा स्मरणशकती प्राप्त करणे शक्य असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पाश्चात्तय देशांप्रमाणेच विकसनशील देशांमध्ये सिगारेट ओढण्यार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सिगारेटच्या प्राबल्यामुळे मेंदूच्या आजाराने ग्रस्त असणार्‍या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सिगारेटच्या जास्त आहारी गेलेल्या व्यक्तीला नित्याच्या व्यवहारातील साध्या बाबीदेखील लक्षात ठेवणे शक्य होत नाही. दिवसेंदिवस त्यांच्यातील विसरभोळेपणा वाढतो. अशा व्यक्तींना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात स्मृतीभ्रंशासारखे आजार होण्याचा धोका अधिक असल्याचे या प्रयोगातून निष्पन्न झाले आहे. 

Read agriculture ( Please Add Skeep ) ..................... 

No comments:

Post a Comment