Tuesday 12 March 2013

जास्त ‍टीव्ही पहाण्याने मधुमेह वाढतो!

                  जास्त ‍टीव्ही पहाण्याने मधुमेह वाढतो! 


daibities
ND
हॉवर्ड स्कूलच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की, जास्तवेळ टीव्ही पाहण्यामुळे टाइप दोन मधुमेहाची शक्यता वाढते. त्यामुळे हृदय रोगाची आणि अर्भक मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे टीव्ही पासून चार हात लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


हॉर्वर्ड स्कूलचे प्रोफेसर फ्रँक हू यांनी सांगितले की, मधुमेह रोखण्यासाठी केवळ योग्य आहार आणि व्यायाम गरजेचा नाही तर टीव्ही पाहण्यावरही नियंत्रण आणण्याची गरज आहे. या अभ्यासासाठी 1970 ते 2011 या काळात प्रसिद्ध झालेले शोधनिबंधही लक्षात घेतले आहेत. यातूनही जास्त वेळ टीव्ही पाहण्यामुळे टाईप दोन मधुमेह बळावण्याची शक्यता वर्तवण्यात आली अहे. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. आहारात तेल व मेद, शर्करायुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते मधुमेहाला कारणीभूत ठरते. 

Read Udan Storis ( Please Add Skeep ) .................... 



2007मध्ये करण्यात आलेल्या एका पाहणीनुसार भारतात जगामधील सर्वाधिक म्हणजे 50.9 दशलक्ष मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यानंतर चीनमध्ये 43.2 दशलक्ष, अमेरिकेत 26.8 दशलक्ष, ‍रशियात 9.6 दशलक्ष, ब्राझीलमध्ये 7.6 दशलक्ष, जर्मनीत 7.5 दशलक्ष, पाकिस्तानात 7.1 दशलक्ष, जपानमध्ये 7.1 दशलक्ष तर इंडोनेशियात 7 आणि मेक्सिकोत 6.8 दशलक्ष मुधमेहाचे रुग्ण आहेत.

No comments:

Post a Comment