Wednesday 13 March 2013

यौवनप्रांतातलं पहिलं पाऊल !

                             यौवनप्रांतातलं पहिलं पाऊल ! 



शरीराच्या आधी मुलीच्या मनाची तयारी व्हायला हवी

youwanatala pahila paul

सौ शकुंतला गोगटे

शेती करण्याआधी शेतकरी जमीननीट नांगरून तिची सगळी मशागत करून ठेवतो. मुलगी वयात येण्यापूर्वी, स्त्री म्हणून तिचं जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरू होण्यापूर्वीच तिच्या मनाची त्यासाठी तयारी करणं, तिच्या मनाची एक मशागत करून ठेवणं हे मुख्यतः मुलीच्या आईचं, किवां आई नसल्यास मोठ्या बहिणीचं आणि शाळेतल्या तिच्या शिक्षिकेचंही काम असतं.
मुलाची पौगंडावस्था नि मुलीचं यौवन प्रांतातलं पहिलं पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. मुलांना ‘फॅक्ट्स ऑफ द लाइफ ’ बद्दल सांगणारे पुष्कळजन असतात. भाऊ असतात, मित्र असतात असल्या विषयांवर ते अगदी खुल्लमखुल्ला बोलू शकतात पण मुलीची आई जर समजा फारच सोवळ्या विचाराची असेल, तिच्या घरच्या वातावरणात मोकळेपणाचा अभाव असेल, आईच्या धाकानं तिला मैत्रिणींच्यातही फारसं मिसळता येत नसेल नी शाळेतही सेक्स एज्युकेशन मिळलेलं नसेल, तर अशी मुलगी वयात येताना अतिश्य कावरीबावरी होते, हवालदील होते, भिऊन जाते.

शंभर वर्षांपूर्वीच्या काळी, म्हणजे जेव्हा मुलगी वयात येण्यापूर्वी तिचं लग्न होत असे, बालविवाहाची प्रथ जेव्हा रूढ होती त्या काळात पहिल्यांदा नहाण आलेल्या छोट्याशा सौभाग्यवतीचं खूप कोडकौतुक केलं जात असे, त्या काळातल्या ‘न्हाणुली’ ला मखरात बसवत असत. तिच्या सासर माहेरचे किंवा अन्य जवळचे नातलग तिच्यासाठी चार दिवस चांगली चांगली स्वादिष्ट पक्वानं घेऊन येत असत. चार दिवस ती ‘अस्पृश्य’ असली तरी या कोडकौतुकाच्या बरसातीनं ती सुखावत असे. मग पाचव्या दिवशी ती स्वच्छ झाल्यानंतर मुहूर्त वगैरे पाहून तिचा गर्भाधान विधी केला जात असे. त्याकाळी न्हाणुलीचं असं कौतुक होत असे कारण पहिल्यांदा नहाण आलं म्हणजे तिच्या पतीच्या शेजेसाठी सिद्ध होत असे. या पहिल्यांदा नहाण आलेल्य न्हाणुलीचं दृश्य २२ जून १८९७ या नुकत्याच येऊन गेलेल्या चित्रपटात ‘सीताबाई चाफेकळीला नहाण आलं’ या गाण्याच्या दृश्यात आपल्या पैकी पुष्कळांनी पाहिलं असेल.


Read agriculture ( Please Add Skeep ) ................. 


पण पुढं बालविवाहाची प्रथा बंद पडून मुलींची लग्नं उशिरा व्हायला लागली म्हणजे लग्नाच्या आधीच मुलगी वयात येऊ लागली. पण तेव्हापासून न्हाणुलीचं कौतुक पडून मुलगी वयात आलेली पाहिली की तिची आई मोठ्या काळजीत पडलेली दिसू लागे. मुलगी न्हातीधुती झाली आता एकदा वेळेवर तिचं लग्न झालं तर बरं, नाहीतर मग चुकून वाटणाऱ्या या काळजीतूनच ‘पहिली पाळी’ या घटनेकडे पाहायची स्त्रीची नजर बदलली.
माझ्या लहानपणी तर बहुतेक मुलींना पाळीबद्दल काहीच नीटशी माहिती नसे. विचित्र, अर्धवट कुतुहल मात्र खूप असे. दर महिन्याला घरातल्या पांघरूण वेगळं, कुणी त्यांना शिवयाचं नाही. त्यांची आंघोळीची मोरी पण वेगळीचं. असं दृश्य सर्रास प्रत्येक घरात दिसून असे. अशा बाईला किंवा मुलीला विटाळशी म्हटलं जाई. तो शब्दच इतका घाणेरडा होता की विटाळशी म्हणजे कुणीतरी घाणेरडी बाई असं वाटे. बायकांना आणि मोठ्या मुलींना दर महिन्याला नेमका कावळा कसा आणि का शिवतो याचं घरातल्या लहान मुलींना नेहमीच मोठं नवल वाटे. कधीतरी मोठ्या बहिणीचे रक्तानं भरलेले कपडेही नजरेला पडत. मनातून अतिशय भीती वाटे. पन कुणी नीट समजावून सांगेल तर शपथ. मग अचानक एखादे दिवशी शाळेत किंवा ‘घराबाहेर असताना परकरावर डाग पडला की बिचाऱ्या मुलीच्या फटफजितीला पारावार उरत नसे. तिल अगदी मेल्याहून मेल्यासारखे होत असे.

आपल्याला पाळी आली आहे म्हणजे काहीतरी वाईट घडलंय, आपल्या हातून काहीतरी चूक घडलीच अशा विचारानं मुलगी कानकोंडी होऊन जात असे. एकदम रक्त पाहून ती भिऊन जात असे. ‘विटाळ’ हा शब्द ऐकला की कोणती कोवळी मुलगी शहारणार नाही ?
आता अर्थातच समाज बदललाय, मुलींच्या वागण्यात खूप आत्मविश्वास आला आहे. घरातल्या वातावरणातसुद्धा प्रसन्न मोकळेपणा आला आहे. निरोध आणि लूप असले शब्द आता लहान मुलामुलींना ठाऊक असतात. सॅनिटरी टॉवेल्सच्या जाहिराती सिनेमागृहातून आणि टी. व्ही. वर सुद्धा दाखवल्या जातात. ह्या बाबतीतला इतका उघडेवाघडेपणा आणि सवंगपणा पण मनाला तितकासा सुचत नाह. हे चित्र अजून थोडं बदलायला हवं असं वाटतं. त्यासाठी काही विचार खाली मांडले आहेत.
बहुतेक शाळांतून आता शरीरशास्त्र हा विषय शिकवताना स्त्री शरीराची आणि शरीरधर्माची ओळख मुलींना करून दिली जाते. पण पुष्कळदा पाळी येऊन गेल्यावर हे शिक्षण शाळेत दिलं जातं. थोड्या मोठ्या आणि जबाबदार मुलींना हे शिक्षण देण्यापेक्षा मुलींच्या दहाव्या अकराव्या वर्षीच तिच्या शरीरधर्माची ओळख तिला करून दिली पाहिजे. सरळ आणि सोप्या पण शास्त्रीय भाषेत अशी सगली पूर्व कल्पना दिली गेली तर ती केव्हांही जास्त चांगली.

पण शाळेपेक्षाही मुलीचं मन तयार करण्याची मुख्य जबाबदारी मुलीच्या आईची आहे. “मेला बायकांचा जन्मच वाईट” म्हणूनच देवानं तिच्यामागं पाळीचा हा त्रास लावला आहे. पूर्वीचे लोक तर अशा बाईला चार दिवस अगदी अस्पर्श मानत. पण हल्ली मेला सगळाच अनाचार माजलाय असं आईच जर बोलू लागली तर मुलीलाही पाळी हे संकट वाटणारच. यापेक्षा आईनंच तिला चांगल्या शब्दात ऋतुमती होणं हे निसर्गाचं वरदान आहे असं सांगून मुलीला आपल्या पहिल्या पाळीचं स्वागत करायला शिकवलं पाहिजे.
कळीचं जसं पूर्ण विकसित फूल होतं तशीच रजोदर्शनानंतर मुलीची बाई होते. मुलगी वयात येते. निसर्गानं तिला अपत्यधारणेची जी महान देणगी दिली आहे ती स्वीकारायला ती लायक बनते. निसर्गक्रमानुसार जे घडतं ते अमंगल असेलच कसं ? म्हणून आईनंच मुलीला त्यातलं मांगल्य समजावून सांगायला हवं.




Read Children Stori ( Please Add Skeep ) ............................ 



महिन्यातल्या या चार दिवसांत कोणती काळजी घ्यायला हवी, स्वच्छता कशी राखायला हवी हेही पहिल्या पाळीच्या वेळी आईनंच मुलीला सांगायला हवं. एखाद्या आईला जर हे जमत नसेल तर तिनं निदान आपल्या मुलीला विश्वासातल्या एखाद्या लेडी डॉक्टरकडे तरी जरूर पाठवायला हवं. सॅनिटरी टॉवेल्स कसे वापरले, त्यांची विल्हेवाट कशी लावावी, पाळीच्या वेळी जर विशेष त्रास होत असेल तर लाजून ती लपवून ठेवण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांपाशी मोकळेपणानं बोलून उपचार घेणं किती अगत्याचं आहे हे सगळ मुलीला आपोआप कसं समजणार ? यात लाजण्यासारखे काहीही नाही. म्हणजे लाजिरवानं काहीही नाही असं मुलीला वाटायला हवं. अशी खोटी लज्जा कधी कधी किती घातक ठरते हेही आईनंच मुलीला नीट समजवायला हवं.
वयात आल्यानंतर अनिर्बंध पुरुष सहवास घडल्यास त्याचे काही परिणाम होऊ शकतील याची पण मुलीला पूर्ण कल्पना दिली गेली पाहिजे.
यौवन प्रांतात पडे पहिले पाऊल गडे !
मोहरली जिवीची अंबराई ग !
जरा हळू जपून चल बाई ग ’ 


अशी सूचना पण आईनं मुलीला जरूर द्यायला हवी.
पहिली पाळी येण्याआधीच ही सगळी पूर्वतयारी मनाची ही मशागत व्हायला हवी.

No comments:

Post a Comment